जाहिरात
चामोर्शी

गटविकास अधिकारी पोळ यांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने स्वागत

Spread the love

लोकशाही न्युज,चामोर्शी (दि.१९ जानेवारी)

पंचायत समिती चामोर्शी येथे नव्याने रुजू झालेले प्रकाश लालासाहेब पोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) तथा गटविकास अधिकारी (गट अ ) यांचे आज दि. १९ जानेवारी रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चे वतीने पुष्प गुच्छ संविधान प्रत देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांचे उपस्थितीत शिक्षक संवर्ग व पंचायत समिती अंतर्गत इतरही कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न व अडचणी असल्याने लवकरच संघटनेसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

या स्वागत प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव ओमप्रकाश साखरे, जिल्हा उपाध्यक्षा सविता उराडे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर भैसारे, सचिव डॉ सचिन कुळसंगे, कार्याध्यक्ष दादाजी शेडमाके, मार्गदर्शक प्रमोद उंदीरवाडे, राहुल गेडाम,देवानंद बोरकर, रत्नदीप साखरे, कोषाध्यक्ष रुपेश खेवले, सुधाकर गेडाम, अनिल मेश्राम, जितेंद्र मुसद्दीवार,रवी खेवले, सुनील खोब्रागडे, मच्छिन्द्रनाथ हिचामी, नीता खेळकर, अर्चना हाताळकर धर्मेंद्र बुग्गावार, चांगदेव सोरते इत्यादी पदाधिकारी हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button