लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
श्री अशोक ना. लांडे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिखली यांचे • मार्गदर्शनाखाली चिखली पोलीसांची धडक कार्यवाही सुरु झाली असुन अवैदय धंदयावाल्यांवर वचक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अवेदय धंदयावाल्याचे धाबे दणाणले असुन त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. चालु वर्षात माहे जुन पावेतो वरली मटक्यावर 50 वेळा घाडी टाकण्यात आल्या असुन 52068/ रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. तसे जुगारावर 9 वेळा धाडी टाकुन 5,83,702 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये माहे मे मध्ये 15 ठिकाणी दारु अडडयावर धाडी टाकुन 10220/- रुपयाचा तसेच 5 ठिकाणी जुगार अडडयावर धाडी टाकुन 29370/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सर्वात जास्त म्हणजे माहे जुन 2022 मध्ये अवैद्य दारु अडडयावर 20 ठिकाणी धाडी टाकुन 5,09,195/- रुपयाचा मुद्देमाल तसेच 6 ठिकाणी जुगारांवर धाडी टाकण्यात आल्या असुन 10,705 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात चिखली पोलीसांना यश आले आहे. तसेच जुलै महिण्यात मागील 3 दिवसात पथकाने 4 ठिकाणी जुगार अड्डयावर धाडी टाकुन 34595/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे त्यामुळे अवैदय धंदयावाल्यांचे धाबे दणाणले असुन त्यातच गुटखा विक्रेत्यांना अद्दल घडविण्यासाठी आम्ही स्वतः शहरातील अनेक ठिकाणी शहरातील दुकाणांची व ठोक विक्रेत्यांची पाहणी करत असुन त्याचा धसका घेत गुटखाकिंग अज्ञात स्थळी गुटखा लपविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता श्री अशोक ना. लांडे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चिखली यांचे मार्गदर्शनाखाली पथकाची नेमणुक करण्यात आली आहे..
