जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

सर्वोदय वार्डातील खुले चेंबर देत आहेत मृत्यूला आमंत्रण. नगर परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन.

Spread the love

गडचिरोली (दि,८जुले)
पटवारी भवना पासून ते गुजरी जाणाऱ्या रोड वरील नालीला चेंबर वर झाकण बसवण्याची मागणी,सर्वोदय वार्डातील उमाकांत बाळेकरमकर यांच्या घराजवळील रस्ता अरुंद असून सतत वर्दळीचा असतो. रस्त्यावर एका बाजूला सायकल व मोटार सायकल ठेवलेले असतात. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना दुसऱ्या बाजूने जाताना रस्त्यावरील खड्डे दृष्टीपथास पडत नसल्याने अनेक गाड्या खड्यात गेलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेले की त्या रस्त्यावरुन जाणाऱ्यांना देखील याचा फटका बसून लहान मुलांबरोबर मोठ्या माणसांनाही खड्यात पडून हातापायाला इजा होत आहे, तेव्हा सदर खड्यात पडून एखाद्याचा मृत्यू होण्याआधीच खड्यावरील झाकणाची व्यवस्था केल्यास एखाद्याचे प्राण जाण्यापासून रोखता येईल. परंतु त्याकडे अधिक काळ दुर्लक्ष केल्यास आणि एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला नगर परिषदेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार राहील असे मत व्यक्त करून लवकरात लवकर झाकण बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सर्वोदय वार्डातील जनतेनी केलेली आहे.

श्री विलास निंबोरकर
अंनिस,सामाजिक कार्यकर्ते
👇👇
तात्काळ नालीवरील झाकण न लावल्यास वार्ड वासीय काढणार नगरपरिषद वर मोर्चा.

अंकुश भालेराव
इंजिनयर नगर परिषद
गडचिरोली ..
👇👇
संबंधित कंत्राटदाराला नाली वरील झाकण बसवण्याचे सक्त निर्देश दिलेले आहेत तरी लवकरात लवकर नालीवरील झाकण बसवण्याच्या कामाला गती येईल ..

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button