रोटरी क्लब तर्फे वृषारोपणाचा कार्यक्रम संपन्न
गडचिरोली (दि,८जुलै)
झाडे लावा,झाडे जगवा,,वृक्षतोड करू नका , जीवन धोक्यात टाकू नका ,
नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळावी व पर्यावरण संतुलित रहावे या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून ८ जुलै २०२२ वा रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर व रोटरी क्लब ऑफ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम ‘ जायका मोटर्स ‘ गडचिरोलीच्या प्रांगणात घेण्यात आला . याप्रसंगी अशोका , वड , कडूलिंब , आंबा , लिंबू ही वृक्ष लावण्यात आली . त्याप्रसंगी रोटरी क्लब स्मार्ट सिटी चंद्रपूरचे अध्यक्ष रोटे . अमोल पोटूडे , सचिव रोटे. चंदा खांडरे , रोटे रश्मि पोटूडे तर रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीचे अध्यक्ष रोटे . दिवाकर बारसागडे सचिव – रोटे . नंदकिशोर काबरा व रोटे . सुनिल बढुवार तसेच पोलिस उप निरीक्षक अशोक माने व जयका मोटर्स गडचिरोली प्रभारी श्री . परिमल वैध , मोहनलाल बांबोळे , अमित भगत,आशिष रिनाईत, संजय निखारे, समिक्षा सोनटक्के व त्यांची कार्यालयातील चमू उपस्थित होते .
याप्रसंगी ” झाडांना करू नका नष्ट , श्वास घेताना होईल कष्ट “ हे मोलाचा संदेश याप्रसंगी देण्यात आला . कार्यक्रमा अंती क्लबच्या सचिव रोटे. चंद्र चंदा खंडारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .
