जाहिरात
गडचिरोली

रब्बी हंगामातील उर्वरित ७०% धानाची खरेदी करा,आमदार डॉ देवरावजी होळी

धान खरेदी करण्यात येईल शेतकऱ्यांनी चिंता करू नये उपमुख्यमंत्र्यांचे आमदारांमार्फत आश्वासन

Spread the love

विदर्भातील आमदारांचे उपमुख्यमंत्री यांना साकळे

दि, ३ जुलै २०२२ मुंबई

रब्बी हंगामातील धानाची खरेदी करताना केवळ ३० टक्के धानाची खरेदी करून खरेदी केंद्र मुदतीपूर्वीच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून रब्बी हंगामातील उर्वरित ७० टक्के धानाची खरेदी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला तातडीने निर्देश देण्यात यावेत व खरीप हंगामातील धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली.
यावेळी विदर्भातील आमदारांनी आपल्या मागणीचे संयुक्त हस्ताक्षरातील निवेदन उपमुख्यमंत्री महोदयांना दिले. याप्रसंगी विदर्भातील आमदार डॉ परिणयजी फुके ,आमदार विनोदजी अग्रवाल , आमदार विजयभाऊ रहांगडाले, आमदार टेकचंदजी सावरकर आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे चर्चा चिंता करू नये शेतकऱ्यांचे धान लवकरच खरेदी करण्यात येतील असे आश्वासन आमदार महोदयांच्या निवेदनाच्या वेळी दिले.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा,नागपूर हे धानाचे प्रमुख उत्पादक जिल्हे असून या जिल्ह्यांमध्ये यावर्षीच्या रब्बी हंगामातील धानाची खरेदी थांबलेली आहे. यावर्षी खरीप हंगामातील धानाला महाविकास आघाडी सरकारने बोनस नाकारले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. रब्बी हंगामातील धानाची ३०% च खरेदी करून खरेदी केंद्रही बंद करण्यात आले. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकातील उर्वरित 70 टक्के धानाची खरेदी करण्यासंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घ्यावा व खरीप हंगाम २०२१-२२ मधील धानाला बोनस देण्यात यावा अशी मागणी विदर्भातील आमदारांसह या निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button