विलास निंबोरकर महा अंनिस : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावातील घटनेचा बोध घेऊन जीवावर बेतणाऱ्या घटनांना पायबंद घालावा.
गडचिरोली (दि,३ जुलै)
चमत्कार करणारे बदमाश , चमत्काराला फसणारे मुर्ख तर चमत्काराला विरोध न करणारे षंढ असतात” असे महा अंनिस तर्फे जन प्रबोधनाच्या माध्यमातून सांगितले जाते. केरळ मधील जाॅन कार्वर यांनी अंंधश्रद्धा निर्मूलनाची मुहूर्तमेढ रोवली आणि ती महाराष्ट्रात बी प्रेमानंद मार्फत अखिल भारतीय अंंधश्रद्धा निर्मूलन चे अध्यक्ष श्री शाम मानव व महा अंनिस चे संस्थापक कार्याध्यक्ष शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोरात सुरू राहीले व आजही त्यांनी निर्माण केलेल्या शाखेच्या वतीने प्रत्येक जिल्हयात व जिल्ह्यातील गावगाड्यात अंंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. अनेको वर्षांपासून मानवी मेंदूवर भूत, भानामती, करणी, जादूटोणा, मंत्रतंत्र, कजली , चकवा, अंगात देवी येणे, आदी गोष्टींचा जबरदस्त पगडा बसलेला असल्याने व समाजात बुवाबाबांना समाजातील राजकीय व श्रीमंतांचे तसेच काही स्वार्थी अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे त्यांचे अभय लाभत असल्याने अंंधश्रद्धेला अधिकाधिक खतपाणी मिळत जाते. टिव्ही वरुन सिरीयल द्वारे चमत्कार दाखवून लोकांच्या मनात ते अधिकाधिक घट्ट केले जाते. त्यामुळेच लोक दवाखान्यातील दवा ऐवजी बुवाबाबांचा दुवा घेण्यासाठी मंदिर, मस्जीद, दर्गे ,चर्च व मठात रुग्णांची गर्दी दिसते. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावी दिनांक २० जून ला अत्यंत संवेदनशील अशी एका सुशिक्षित कुटुंबात अंगात शहारे आणणारी दर्दनाक घटना घडली. शिकले सवरलेले लोक केवळ स्वार्थापोटी एका अशिक्षित भामट्याच्या नादी लागून एकाच वेळी नऊ जनांचा बळी गेला. “कष्टा वीना कोणालाही काहीही मिळत नाही” हे माहित असूनही केवळ अंंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे शिकले सवरलेले लोक बुवाबाबांच्या कचाट्यात सापडल्याने आर्थिकदृष्ट्या लुबाडल्या गेले आणि आपले बिंग फुटले तर जेलची हवा खावी लागेल त्यापेक्षा रस्त्यातील काटे रुतण्याआधी त्यांचा सफाया केलेला बरा म्हणून स्वत:च्या अंगावर येणार नाही याची काळजी घेऊन मोठ्या सिताफीने नऊही जनांना आत्महत्या केल्याचे भासवून विषबाधा घडवून आणून जीवानिशी संपविले. या घटनेचा बोध घेऊन यापुढे तरी जनता कजली सारख्या घटनांचा वापर करून जे अमाप संपत्ती मिळविण्याच्या नादात लागतात त्यांनी तसे न करता या घटनेतून काहीतरी बोध घेऊन घटनांना पायबंद घालण्यासाठी पुढे यावे असे आवाहन महा अंनिस चे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चे राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर यांनी केले आहे.
पुजेच्या नादी लागून स्वत:चे आर्थिक, मानसिक शोषण करून घेणारे दोषी की करणारे हे जनतेनीच ठरवावे.
