जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली – उमरखेड बस मुरखळा (नवेगाव) जवळ पलटून ४५ प्रवासी जखमी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २१ मे)

गडचिरोली आगारातून सकाळी ७ वाजता ५० प्रवासी घेऊन उमरखेड ला जाणारी बस गडचिरोली शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरच म्हणजे मुरखडा (नवेगाव) येथे वळणावर अनियंत्रीत होऊन पलटली ४५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पलटी झालेल्या बसमधून पोलीस व स्थानिक लोकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बस दुर्घटनाग्रस्त झाल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस व परिवहन विभाग यांच्याकडुन तपास सुरु आहे. बसचा अपघात झाल्यानंतर काही काळापर्यंत महामार्गावर वाहतूक प्रभावित झाली होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button