ताज्या घडामोडीराजकीय
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ
गडचिरोली (दि,३० जून)
महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दरबार हॉलमध्ये नुकतीच दिली.
यामुळे आता मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सत्ता पर्व महाराष्ट्र राज्यात सुरु झाले आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ६ मार्च १९६४ ला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अहिर या गावात झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले आहे त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा अवगत आहेत.
जाहिरात
