जाहिरात
चिखलीबुलढाणा

२४ वर्षीय जवानाचा दिल्ली येथे मृत्यू

चिखली तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नाही

Spread the love

चिखली | मेघा जाधव
चिखली : भारतीय हवाईदलात कार्यरत असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील जवानाचा ट्रेनिंग दरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. काल, २१ जून च्या रात्री नवी दिल्ली येथे ही घटना घडली आहे. राहूल इंगळे (२४) असे या जवानाचे नाव असून तो चिखली तालुक्यातील भालगाव येथील राहणारा आहे.

याबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अनुसार, राहुल इंगळे हे भारतीय कार्यरत असून त्याची ट्रेनिंग बेळगावला होती. ५ तारखेपर्यंत तो सुट्टीवर होता. त्याचा जो ट्रेडवर्क होता त्याची ट्रेनिंग दिल्लीला होती. त्याकरिता राहुल इंगळे १६ तारखेला दिल्ली येथे गेला होता. प्रशिक्षण दरम्यान त्याला चक्कर आल्याने तो पडला, आणि त्या अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबतची सविस्तर हकीकत उद्या सकाळपर्यंत समोर येणार आहे.

राहुलचे पार्थिव उद्या, २३ जून रोजी पहाटे विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात येईल. त्यानंतर उद्या दुपारी भालगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. दीड वर्षापूर्वी राहुल हवाईदलात भरती झाला होता. अतिशय खडतर आर्थिक परिस्थिती असताना दुकानात काम करून तर कधी मजुरी करून त्याने शिक्षण घेतले होते. महिनाभरापूर्वी सुट्टी आटोपून तो कर्तव्यावर दिल्लीला गेला होता. उद्या त्याचे पार्थिवच गावात येणार आहे. राहुलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. राहुलच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे गावासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे…

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button