जाहिरात
आरमोरीभ्रष्टाचार

ए सी बी च्या जाळ्यात महिला तलाठी ६००० रुपये घेणे पडले महागात

Spread the love

गडचिरोली (दि,२२ जून) वडिलोपार्जित भाऊ हिस्सा हक्कसोड शेत जमिनीचे फेरफार करण्यासाठी ७५०० रुपयांची मागणी करून तडजोडी अंती
६ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारतांना महिला तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल २१ जून रोजी रंगेहाथ पकडले आहे. रोहिणी श्रीहरी कांबळे (३७) असे लाचखोर महिला तलाठ्याचे नाव आहे.
तलाठी रोहिणी कांबळे यांनी सदर काम करुन देण्यासाठी ७५०० रुपयांची मागणी केली. मात्र तक्रादार यांना कोणतीही रक्कम तलाठी रोहिणी कांबळे यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला असता मंगळवार २१ जून रोजी इंजेवारी येथील तलाठी कार्यालयात ताडजोडीअंती ६ हजार रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी तलाठी रोहिणी कांबळे विरोधात पोलीस ठाणे आरमोरी येथे लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सपो प्रमोद ढोरे, पोहवा नथु घोटे, राजेश पदमगिरवार, स्वप्नील बांबोळे, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी केली .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button