डोंगरगाव भुसारी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निखिल धार्मिक यांची सर्वानुमते निवड
आरमोरी (दि, २३ जून): तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव भू येथील जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समिती ची पुनर्रचना नुकतीच दि २१ जून २०२२ करण्यात आली या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी येथील विद्यार्थ्यांचे पालक श्री निखिल धार्मिक यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी म्हणून नव्या नवलाजी धोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या समितीच्या सदस्य पदी शिक्षणतज्ञ श्री दौलत धोटे , व्यवस्थापन समिती मध्ये पालक सदस्य मधून राजू शेषराव ढोरे, राजू हिरामण कुत्तरमारे ,जतन सिंग डांगी सुनील लिंगायत कल्पनाताई शिंदे, अरुण राऊत, भारती भारत माकडे, अर्चना फाल्गुन धोटे ,मीनाक्षी संतोष धोटे, या शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून श्री रवींद्र सोमनकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा यांची सर्वानुमते पालक सभेमध्ये निवड करण्यात आली योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी जिल्हा परिषद डोंगरगाव भू येथील उच्च प्राथमिक केंद्र शाळा मध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते या पालक सभेत या नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी समितीचे सदस्य श्री राजू शेषराव दोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष जी शेलोटे होते आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच पालक वर्ग यांनी पण हजेरी लावलेली होती या कार्यक्रमाचे निमित्त साधून माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष जी शेलोटे यांचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्टपणे गेला असल्याने जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव भुसारी यांच्या वतीने संतोषजी शेलोटे यांचा शाल श्रीफळ देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नवीन , अध्यक्ष ,सदस्य तसेच शिक्षक वृंद तर्फे सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे संचालन येथील सहाय्यक शिक्षिका कुमारी चापले मॅडम यांनी केले तर आभार शाळेतील शिक्षक श्री बोरकर यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता .
