जाहिरात
गडचिरोली

२४ जून पासून गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील सर्व नळाच्या पाण्याचा करावा वापर

Spread the love

गडचिरोली,(दि.२३ जून) नगर परिषद क्षेत्रातील सर्व नळ धारक नागरिकांना सुचित करण्यात येते की, चामोर्शी रोडवरील ३०० एम.एम.सी.आय.पाईप लाईन गोकुळ नगरमध्ये जाणारी २५० एम.एम.सी.आय. पाईप लाईन इतर डिस्टीब्युशन पाईप लाईन साफ करण्यात आली असून विर बाबुराव शेडमाके चौक, गोकुळ नगर, चनकाई नगर, आर्शिर्वाद नगर, गणेश नगर व इतर परिसरातील नागरिकांच्या घरगुती नळाचे पाणी नमुने तपासणी करीता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तपासणी अंती सदर पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याबाबत अहवाल नगर परिषदेस प्राप्त झाला आहे. तरी सर्व नळ धारकांनी दिनांक २४ जून २०२२ पासून पाण्याचा वापर पिण्याकरीता करावा असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button