जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

नगर परिषद गडचिरोली निवडणूक २०२२ चे आरक्षण आज जाहीर .

Spread the love

(गडचिरोली दि,१३ जून)                                        नगर परिषद गडचिरोली येथे आज सकाळी ११ वाजता स्थानिक सभागृहात २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत,नगर परिषद प्रशासक अंकित सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ ,उपमुख्य अधिकारी रवींद्र भांडारवार यांच्या हजेरीत काढण्यात आली.
शहरातील निवडणूक लढवणारे इच्छुक दिग्गज व महिला,व नामवंत  याप्रसंगी हजर होते .
आधीच १४ जागा महिलांसाठी राखीव असल्याने उर्वरित जागेसाठी ईश्वर चिट्ठीने लहान मुलांच्या हातून चिट्ठी काढुन आरक्षण जाहीर करण्यात आले,

सदर आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना १५ ते २१ जून २०२२ पर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येणार आहे.
आरक्षण पुढीलप्रमाणे…
प्रभाग क्रमांक १ – सर्वसाधारण एससी(SC) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक २ – सर्वसाधारण एसटी(ST) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ३ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ४ – एसटी(ST) महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ५ – एससी (SC)महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ६ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ७ – सर्वसाधारण एससी (SC)आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ८ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक ९ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १० – सर्वसाधारण एसटी(ST) आणि सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक ११ – एसटी (ST)महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १२ – सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण महिला/ पुरुष
प्रभाग क्रमांक १३ – एससी (SC)महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला/ पुरुष

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button