जाहिरात
Uncategorizedचिखली

चिखली पोलिसांची चोराविरुद्ध धडाकेबाज कार्यवाही

Spread the love

चिखली प्रतिनिधी मेघा जाधव
(दि,३ जून)          पोलीस स्टेशन चिखलीच्या डि.बी. पथकाने पुन्हा एकदा धडाकेबाज कार्यवाही करत चोरी गेलेले २८ मोबाईल व १ मोटर सायकल केली चोरटयांकडुन जप्त मागील काही दिवसापासुन चिखली शहर व परिसरात मोबाईल चोरींचे प्रमाण वाढल्याने पोलीस स्टेशन चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी डि.बी.चे पोउपनि धनंजय इंगळे, पोहेकॉ अताउल्ला खान, विजय गिते, सुधाकर पाडळे, रामेश्वर भांडेकर, निलेश सावळे, प्रमोद साळवे, राहुल पायघन, संतोष जाधव यांचे एक पथक तयार करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून मोबाईल चोरटयांचा छडा लावण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून डि.बी. च्या वरिल पथकाने गोपनिय माहिती काढुन चिखली शहरातील १) अमोल उर्फ राहुल गजानन वाघ २) आनंद उर्फ पप्या गुलाबराव आनपट ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चिखली शहर व परिसरातुन वेगवेगळया कंपनीचे एकुन २८ मोबाईल ज्याची एकुन किंमत २,५१,००० रूपये किमतीचा मोबाईलचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच पोलीस स्टेशनला दाखल मोटर सायकल चोरीचा अप.क्र. ४७७ कलम ३७९ भादंवी मधील आरोपी क्र.१) सौरभ प्रदिप गायकवाड २) करण दिपक ठाकुर दोन्ही रा. चिखली यांना ताब्यात घेवुन त्यांनी सदर गुन्हयात चोरलेली मोटार सायकल क्र. एम.एच.२८ पी. ६१७३ ज्याची किंमत अंदाजे २०,००० रूपये अशी जप्त करण्यात आली. वरिल चारही आरोपी कडुन एकुन २,७१,००० रूपयाचा माल जप्त केला. सदरच्या कारवाईमधे जप्त असलेल्या वरिल मोबाईल बाबत ठाणेदार अशोक लांडे यांनी जनतेला आवाहान केले आहे कि ज्या लोकांचे मोबाईल चोरी गेले असतील किंवा हरविले असतील त्यांनी पोलीस स्टेशन चिखलीशी संपर्क साधावा. सदरच्या धडाकेबाज कारवाई मुळे जनतेनी चिखली पोलीसांचे कौतुक केले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरीया, अपर पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त, श्री बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे नेतृत्वात डि.बी. पथकाचे पोउपनि धनंजय इंगळे, पोहेकॉ अताउल्ला खान, सुधाकर पाडळे, रामेश्वर भांडेकर, निलेश सावळे, प्रमोद साळवे, राहुल पायघन, संतोष जाधव, पंढरी मिसाळ, अर्चना सरदार यांनी केली आहे. वरिल गुन्हयांचा तपास स. फौ. अशोक गाढवे व ना. पो. का. विजय गिते, पोशि सुनिल येवले करीत आहेत…

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button