जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे योग शिबिर संपन्न
गडचिरोली (१ जून )
१९२ बटालियन केन्द्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
२१ जून २०२२ रोजी ८ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२२ च्या स्मरणार्थ विविध ठिकाणी ७५ दिवसांचे योग कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गडचिरोली येथील केन्द्रीय राखीव पोलीस दलाची १९२ बटालियन, श्री देवराज, कमांडंट यांच्या मार्गदर्शनाखाली १ जून २०२२ रोजी जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचान्यांना विविध प्रकारची योगासने व प्राणायाम व योगाभ्यासाची सविस्तर माहिती केन्द्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनचे योग प्रशिक्षक CTIGD अभिजीत कुमार यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश रोकडे व इतर सहकाऱ्यानी योग शिबिरात उत्साह दाखवून CRPF च्या प्रशंसनीय कार्याचे कौतुक केले.
