भाजपा विधी प्रकोष्ठ तर्फे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता व रोडांची डाग डुगी करण्याची मागणी
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
पुढील महिन्यापासून पावसाळ्याची सुरुवात होणार आहे चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभाग व महाकाली प्रभागांमध्ये अनेक लहान मोठे नाले आहेत त्या नाल्यांची स्वच्छता पावसाळ्याच्या पूर्वी करण्यात यावी,नाल्यांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी न झाल्यास पाऊस आल्यावर ते नाले चोकप होईल व ते घाण पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी व रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे
महाकाली प्रभाग व भिवापूर प्रभागांमध्ये अमृत योजना अंतर्गत काही ठिकाणी रस्ते आरसीसी द्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे परंतु अनेक ठिकाणी आजच्या घडीला रोडांची डाग डुगी आरसीसी माध्यमांनी ते रस्ते बुजवण्यात आले नाही त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहील अपघात होण्याची दाट शक्यता आहे व वाहतुकीस अडथळा सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल
भाजपा विधी प्रकोष्ट चे जिल्हाध्यक्ष ॲड.हरीश विजय मंचलवार यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपुर चे उपायुक्त यांना पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता वर रस्त्याची डाग डुगी करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले उपायुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. उपायुक्तांनी दोन्ही गांभीर्याने लक्ष देऊ व दोन्ही समस्यांचे निवारण करू असे आश्वासन देण्यात आले आहे
