जाहिरात
चंद्रपूरब्रेकिंग न्युज

मुल महामार्गावर चिचपल्ली अजयपुर येथे दोन ट्रक मध्ये भीषण अपघात.

९ जणांचा होरपडून मृत्यू

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी

दिनांक १९/५/२०२२ रोजी रात्री वेळ ११:०० वाजता मुल महामार्गावर चंद्रपूर पासून वीस किलोमीटर अंतरावर अजयपुर येथे भीषण अपघात झाला. मूल महामार्गावरील दोन ट्रक मध्ये आमने सामने टक्कर झाल्याने. ट्रकला आग लागली ती आग ईतकी भिषण होती की त्या आगीमध्ये वाहन चालक याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
एक ट्रक डिझेल टँक व दुसरा ट्रक लाकडाने भरला असल्याने आगीने उग्र रूप धारण केले.आग मोठ्या प्रमाणात वाढली . आणि आजूबाजूला परिसरात सुद्धा आग लागली असे कळले. या अपघातात दोन्ही ट्रक पेट घेतल्याने दोन्ही बाजूची मुल महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. घटनेची माहिती अग्निशामक विभागाला कळविण्यात आली. अग्निशामक विभागाने घटनेची माहिती मिळताच घटनेच्या ठिकाणी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीने रुद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा यश अजूनही आले नाही. अग्निशामक विभागाला आग विजविण्याकरिता बहुत प्रयत्न करावा लागले. या अगी मध्ये ट्रक चालक याचे काय झाले ? ते अजून स्पष्ट झाले नाही. आगीचा तांडव असल्याने मुल मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

चंद्रपूर-मूल मार्गावरच्या काल रात्री अजयपूर येथे झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. अजयपूर गावाजवळ काल रात्री २ ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली होती. अपघातानंतर भीषण आग लागल्याने ट्रकचे टायर फुटल्याने आग भडकली होती.
मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकांनी आग विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button