जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

म. फुले- डॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात वैज्ञानिक जाणिव जागृती कार्यक्रम संपन्न.

Spread the love

दि. १९.५.२२ ला महिला महाविद्यालय गडचिरोली येथे म.फुले – डॉ आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोलीच्या वतीने एम एस डब्लू च्या अंतिम शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी काॅलेजच्या प्राध्यापिका श्रीमती वुईके मॅडम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते श्री विलास निंबोरकर, श्री पुरुषोत्तम ठाकरे, महा अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव श्री विलास पारखी, बुवाबाजी संघर्ष प्रमुख श्री प्रशांत नैताम, मानसमित्र श्री अरुण भोसले, पाहूणे म्हणून महा अंनिस चे सदस्य श्री उपेंद्र रोहनकर, काॅलेजचे एन एस एस कॅम्प प्रमुख प्रा. श्री किशोर कुडे, सहप्रमुख श्री लाकडे सर आदी उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात सर्प मित्र श्री विलास पारखी यांनी सापा विषयी असलेले समज गैरसमज समजावून सांगितले व सर्प दंशानंतर पिडिताला कशी मदत करायची याविषयी प्रात्याक्षिक करून दाखविले. श्री विठ्ठलराव कोठारे व श्री प्रशांत नैताम यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

श्री निंबोरकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनात संतांनी दिलेल्या योगदानाबद्दल विस्तृत माहिती दिली व अंंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आवाहन केले. श्री ठाकरे व श्री रोहनकर यांनी महा अंनिस चळवळीच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात व सांगता करण्यात आली. श्रीमती वुईके मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अंंधश्रद्धा निर्मूलनासाठी वसतीपाड्यात जावून जनजागृतीचे कार्य करावे असे आवाहन करून संत सुधारकांनी सांगितलेल्या कृतीशील व विवेकी वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मार्गदर्शन एन एस एस चे प्रमुख प्रा. श्री किशोर कुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव मंगर तर आभारप्रदर्शन कु. दिक्षा पेलकापल्लीवार हिने मानले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button