जाहिरात
ताज्या घडामोडी

शासनाची घरकुल योजना ठरली जनतेसाठी फलदायी

Spread the love

गडचिरोली ( दि.२३ मे ) ..                                              आबदाना धुंडते है, अशियाना धुंडते है! घरोंदा चित्रपटातील हे गाण नायक व नायिका आपल्या घरांचे स्वप्नपुर्तीकरीता म्हणनाऱ्यांचे सुंदर गीत. समाजाची कुठलिही वर्गवारी केली श्रीमंत मध्यम गरीब तरी निवास ही अविभाज्य बाब सर्वाचेच भवताल व्यापले.
स्वातंत्र्योत्तर कल्याणकारी शासनाने नागरीकासाठी निर्माण केलेल्या अनेक कल्याणकारी योजनामध्ये निवारा यासाठी अनेक योजना शासनाने केल्या. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना, राज्य शासनाच्या रामाई आवास योजना ( अनुसुचित जातीच्या लाभार्थ्याकरीता) शबरी व आदिम आवास योजना (अनुसुचित जमातीचे लाभार्थ्याकरीता) यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (भटक्या व विमुक्त जातीकरीता) अशा काही प्रमुख योजना आहेत.

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास या कार्यालयामध्ये जिल्हा स्तरावर संपर्क साधल्यास तसेच तालुका स्तरावार पंचायत समिती व ग्रामस्तरावरील ग्रामपंचायत या कार्यालयास याची सर्व माहिती प्राप्त करता येईल. लाभार्थ्यास शासनाने रुपये १,३०,०००/- घर बांधणीसाठी अनुदान मिळण्याबरोबरच रुपये १२.०००/- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय करिता प्राप्त होते. तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभार्थ्यास घरबांधणी करिता मजुरी स्वरुपात रु २३.५६०/ (९५ मनुष्यदिन) मिळतात.

गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल व मोठ्या जिल्हयामध्ये पावसाळ्यात संपर्काकरीता अडचण निर्माण होणे, घरकाम साहित्य पुरवठादार गावातच उपलब्ध न होणे, लाभार्थ्यांनी स्वतः च बनविलेल्या विटा वापरावयाची प्रवृत्ती इत्यादी अनेक अडचणी आहेत व त्यावर स्थानिक उपाय योजना प्रशासनाने केल्या आहेत. कुठे नाहीतर आपल्या जिल्ह्यात ५ ब्रास मोफत रेती, बचत गटामार्फत लाभार्थ्यास सहाय्य, ग्रामपंचायत, पंचायत समिती व्दारे आवास दिन साजरा करून लाभार्थ्यास प्रत्यक्ष मदत, ग्रामीण गृहनिर्माण अभियंताची लाभार्थ्यास वारंवार भेटव मार्गदर्शन अशा नाना प्रकारे लाभार्थ्यास सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे.

लोकप्रतिनिधी प्रशासन जनता यांच्या एकत्रित प्रयत्नातून लाभार्थ्यांचे हक्काच घर उभ राहण्यासाठी प्रयत्न करित आहेत.

महा आवास अभियान अंतर्गत लाभार्थ्याला घरासोबतच उज्वला योजने अंर्तत गॅस, सौभाग्य अंतर्गत विद्युत जोडणी, महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत शोष खड्डा जल जिवन अंतर्गत नळ जोडणी अशा अनेक योजनांचे कृती संगमा मधुन लाभार्थ्यांचे जिवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न शासनामार्फत सुरु आहे. लाभार्थ्यांनी आपले घर मंजुर झाल्यावर तातडीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करणे व नविन घरात आपल्या कुटुंबासह आदर्श जिवनक्रमास सुखात करणे यासाठी दोन पावल पुढे येण्याची गरज आहे. विशेषत: भामरागड, एटापल्ली व सिरोंचा येथिल लाभार्थ्यांनी अधिक गती घेण्याची प्रशासनाची सार्थ अपेक्षा आहे. जिल्ह्यामध्ये २०१६-१७ पासुन सर्व योजना मधुन पुर्ण झालेली २५,६१४ घर व सद्या सुरु असलेली ९.९२२ घर लाभार्थ्यांचे निवान्याचे स्वप्न पूर्ण करीत असल्याचे धोतक आहे. योजनेची जिल्ह्यात सुरू असलेली प्रगती लाभार्थ्याच्या अशियाना शोधण्याचा प्रवासात मैलाचा दगड ठरते आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button