२५ मे, ला (ओबीसी) मोर्च्या च्या वतीने भारत बंद ची हाक
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
गडचिरोली (दि.२३ मे)
राष्ट्रीय पिछडावर्ग( ओबीसी) मोर्चा च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक मुद्यावर २५ मे बुधवारला भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे . या आंदोलनासाठी राष्ट्रीय पिछडावर्ग , राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील विविध संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
भारत बंद चे खालीलप्रमाणे मुद्दे आहेत-
केंद्र सरकार द्वारा इतर मागास वर्ग (ओबीसी ) ची जातनिहाय जनगणना करण्यासाठी, ईव्हीएम घोटाळा याच्या विरोधात व ईव्हीएम बंद करून पेपरवर निवडणुका घेण्यासाठी, खाजगी क्षेत्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू करणेबाबत, मध्य प्रदेश ,ओडिसा आणि झारखंड मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी साठी स्वतंत्र मतदार संघ लागू करण्यासाठी , पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना जल ,जंगल व जमीन यापासून विस्थापित करण्याच्या विरोधात , जबरदस्तीने दबाव आणून करण्यात येत असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या विरोधात , लाकडाऊन काळात कामगारांच्या विरोधात बनविलेल्या श्रमिक कायद्याच्या विरोधात , आदिवासीवरील होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात , आदिवासी क्षेत्र असलेल्या विभागातील अनुसूची ५ व ६ वी नुसार कंपन्यांना दिलेली जल, जंगल ,जमिनीचे खाजगीकरण करू नये, राज्य शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांचे खाजगीकरण करू नये, इत्यादी मागण्यासाठी भारत बंद करण्यात येत आहे.
मा. जिल्हाधिकारी यांना भारत बंद चे निवेदन देताना जनार्दन ताकसांडे, भोजराज कानेकर , प्रमोद राऊत ,रवी निंबोरकर हजर होते.
