दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र वाटप
जिल्हा प्रतिनिधी
संदिप म्हस्के
आज दि.२४/०५/२०२२ मंगळवार रोजी पंचायत समिती जालना तर्फे अनेक दिव्यांग बांधवांना मा राधा कोलते मॅडम वरीष्ठ सहय्यक व मा कवीता पन्हाळे कनिष्ठ सहय्यक प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे नेते शंकर शिरगुळे यांच्या हस्ते अनेक दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र(युनिक आय डी.कार्ड) वाटप करण्यात आले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे नेते शंकर शिरगुळे म्हणाले की वैश्विक ओळखपत्र वाटप करणे ही महत्वकांक्षी योजना असुन सदर ओळखपत्र देशात कुठेही चालणार आहे बस प्रवास करत्यावेळी देखील सवलत घेतांना सदर वैश्विक ओळखपत्र(युनिक आय डी.कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे करीता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे नेते शंकर शिरगुळे यांनी केले याप्रसंगी संतोष सोनवणे अशोक बरकासे संतोष ऊखळे इत्यादी उपस्थित होते .
