
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ ऑगष्ट)
७ ऑगष्ट २०२४ रोज बुधवार ला चंद्रपूर रोड स्थित प्राईम हाॅस्पिटल गडचिरोली येथे नि:संतान दाम्पत्यासाठी निःशुल्क रोग निदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात ५० हुन अधिक पुरुष व महिलांनी लाभ घेतला.
नागपूर येथील मेडिकेअर हाॅस्पिटल एण्ड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांनी गडचिरोली येथील प्राईम हाॅस्पिटल शिरीन टाॅवर चंद्रपूर रोड गडचिरोली येथील संचालिका डॉ जयश्री देवगडे यांच्या सौजन्याने वरील शिबिर सकाळी ११ वाजता पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडले. सदर शिबिरात ५० अधिक महिला व पुरूष रुग्णांनी सहभाग दर्शवून आपली निःशुल्क तपासणी करून घेतली.

शिबिराला हजर डॉ. सरिता रॉय (एम डी स्त्रीरोग तज्ञ नागपूर)
या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. सरिता राय विद्यार्थी एमडी स्त्री रोग तज्ञ नागपूर तसेच गडचिरोली तसेच संचालिका डॉ जयश्री देवगडे एमबीबीएस यांनी सहकार्य केले. त्याच प्रमाणे प्राईम हाॅस्पिटल चे व्यवस्थापक तथा हाॅस्पिटलची संपूर्ण टिम यांनी सुद्धा अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या बाबत संपूर्ण टिम चे प्राईम हाॅस्पिटल च्या व्यवस्थापकांनी आभार व्यक्त केले.
