संत नरहरी महाराज पुण्यतिथी साेहळ्यानिमित्त साेनार समाजबांधव एकवटले
शहरातून काढली रॅली : दिवसभर विविध उपक्रम

लोकशाही न्युज,गडचिराेली(दि,२९ फेब्रुवारी)
स्थानिक साेनार समाज सेवा संस्था गडचिराेलीच्या वतीने २८ फेब्रुवारी राेजी बुधवारला संत शिराेमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा साेहळा आयटीआय चाैक परिसर पंचवटी नगरातील श्री संत नरहरी महाराज मंदिराच्या नियाेजित जागेत पार पडला. दरम्यान, यावेळी संत नरहरी महाराज यांची पालखी व रॅली काढण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले. या साेहळ्यानिमित्त गडचिराेली शहर व परिसरातील साेनार समाज बांधव एकवटले.
यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भ्रष्टाराचारविराेधी जनआंदाेलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे तर अध्यक्षस्थानी सोनार समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष नितीन हर्षे हाेते. मुख्य अतिथी म्हणून वैरागड ग्रामपंचायतच्या सदस्य शीतल सोमनानी, विशेष अतिथी म्हणून चांगदेव फाये, साेनार समाज धानाेराचे अध्यक्ष अजय हाडगे, आरमाेरीचे अध्यक्ष पंकज खरवडे, देसाईगंजचे अध्यक्ष पंढरी कावळे, वैरागडचे अध्यक्ष अरुण हर्षे, चामाेर्शीचे अध्यक्ष चंदन खरवडे, कुरखेडाचे अध्यक्ष शिवकुमार वडीकर आदी मान्यवर उपस्थित हाेते.
सर्वप्रथम मंदिराच्या नियाेजित जागेवर घटस्थापना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता कार्यक्रम स्थळापासून चंद्रपूर मार्गे श्रीराम मंदिर ते इंदिरा गांधी चौक चंद्रपूर मार्गे बाइक रॅली काढण्यात आली. त्यानंतर कृष्णा पाेगळे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी समाजबांधवांना संबाेधित केले. समाजाच्या अधिकार व हक्कासाठी तसेच विकासासाठी समाज एकसंघ राहिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा. राकेश इनकणे, संचालन संस्थेचे उपाध्यक्ष गजेंद्र डाेमळे यांनी केले तर आभार युवा समितीचे अध्यक्ष प्रा. स्वप्निल ढाेमणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहसचिव तानाजी पालकर, कोषाध्यक्ष रमेश भरणे, महिला उपाध्यक्षा अलका खरवडे, महिला सहसचिव वृषाली हर्षे, सदस्य सुरेश भोजापुरे, टिकाराम करंडे, यादवराव हर्षे, पंकज हर्षे, सदस्या सविता डोमळे, अश्विनी चावरे, शुभांगी काळबांधे, शालिनी भरणे, मंजुषा पालकर, माया भोजापुरे, स्नेहा डोमळे, वंदना हर्षे, स्वेता भरणे, प्रीती हर्षे,दर्शना डोमळे,वैशाली भजने,दीपाली नागरे, कल्पना काळबांधे,मीनाक्षी खरवडे,विवेक कारेमाेरे,सचिन हर्षे, श्रीकांत डोमळे, त्रिमूर्ती डोमळे, जगदीश डोमळे, किशोर डोमळे, कृष्णाजी पोवरे,महेश काळबांधे, आशिष भरणे, महेश हर्षे,विकास हर्षे, चेतन काळबांध, मनोज भरणे, छगन काळबांधे, मंगेश हर्षे, नरेंद्र डोमळे, अक्षय हर्षे, अनिकेत हर्षे, हिमांशू खरवडे, प्रसाद खरवडे, किशोर हर्षे, यस भोजापुरे, सुशील काळबांधे, दीप बेहरे, डॉ. प्रशांत भरणे, सुरेंद्र खरवडे,दिलीप कलबांधे, मनोज हर्षे, गुड्डू कारेमोरे यांनी सहकार्य केले तसेच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात सोनार समाज बांधव उपस्थित होते.
या ज्येष्ठांचा झाला सत्कार ¶¶¶
सदर साेहळ्यामध्ये साेनार समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व संत नरहरी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रामभाऊ खरवडे, मनाेहर कारेमाेरे, सरिता खरवडे, क्षीरसागर डाेमळे, मुरलीधर हर्षे, पुंडलिकराव हर्षे, दुधराम डाेमळे, नत्थुजी हर्षे आदींचा समावेश आहे.
स्पर्धेतील विजेते ¶¶¶
सदर साेहळ्यात नृत्य, गीतगायन तसेच वेशभूषा आदी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उमेदवारांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. गीतगायनमध्ये प्रथम क्रमांक विजया पाेगळे, द्वितीय तुळशीदास कारेमाेरे, नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक रितीका खरवडे, द्वितीय नीरा नागरे, वेशभूषेमध्ये मिलिंद हर्षे, मनीष हर्षे यांनी क्रमांक पटकाविला.
गुणवंतांचा सत्कार ¶¶¶
दहावीच्या परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबदल रिंकू डुबरे, संस्कृती चावरे, सृष्टी बेहरे तसेच बारावीमधील शेजल बेहरे, यूजीसी परीक्षा निकिता येवले, राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा पहिला क्रमांक ओर्वी इनकने आदींचा गाैरव करण्यात आले.
