शासकीय आश्रमशाळा तोडसा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेचा जल्लोषात समारोप

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि. २९ नोव्हेंबर)
शासकिय माध्यमिक व उच्च माध्य- कन्या आश्रमशाळा तोडसा ता. एटापल्ली येथे तीन दिवसीय चाललेल्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप गुरुवारी अमर राऊत (भाप्रसे) सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी भामरागड यांच्या अध्यक्षतेखाली तर आकर्ष सर (भा. वनसेवा) वनसंरक्षक भामरागड, रोषणा चव्हाण, सहा- प्रकल्प अधिकारी (प्रशासन), माधव मडावी सहा प्रकल्प अधिकारी (शिक्षण), प्रमोद कोठारे मुख्यध्यापक जांबिया, दिपाली चांदेकर प्रभारी मुख्यध्यापक तोडसा, ज्ञानेश्वर निलेकर प्रकल्प समन्वयक भामरागड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेत खोखो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉब,रिले ४×४०० मीटर, रिले ४ × १०० मीटर या सांधिक स्पर्धा तर १०० मी. २०० मी. ४०० मी. ६०० मी. २०० मी. १५०० मी. ३००० मी. धावणे, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी या वैयक्तिक स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात स्पर्धेत भामरागड प्रकल्पातील तोडसा, ताडगाव या २४ आश्रमशाळेतीत्र १४,१७,१९ वर्ष वयोगटाच्या ७८८ मुले, मुली यांनी सहभाग घेतला कसनसूर, लाहेरी केंद्राच्या क्रीडा प्रकारातून लाहेरी केंद्र यावर्षीचा सर्व-साधारण विजेता संघ तर कसनसूर केंद्र सर्वसाधारण उपविजेता संघ ठरला. विजेत्या संघांना पाहुण्यांच्या हस्ते चषक, मेडल, प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

( स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना मान्यवर)
र्विद्यार्थ्यांनी आपली ध्येये मोठी ठेवावी, ती गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावे. राज्यस्तर, राष्ट्रीयस्तरापर्यंत खेळामध्ये यश मिळवावे असे अमर राऊत (भाप्रसे) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
क्रीडा स्पर्धेच्या च्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांचे मार्गदर्शन, ज्ञानेश्वर निलेकर प्रकल्य समन्वयक यांचे नेतृत्व तर प्रकल्पातील सर्व केंद्र समन्वयक, क्रीडाशिक्षक, तोडसा शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, अधिक्षक, अधिक्षिका, कर्मचारी, प्रकल्प कार्यालयीन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. वितरण कार्यक्रमाचे संचालन व आभार अनिल बारसागडे (माशि) यांनी केले.
