जाहिरात
चिमुरनेरीब्रेकिंग न्युज

ब्रेकिंग न्यूज ,,दुचाकीच्या अपघातात दोन गंभीर, नेरी खांबाडा मार्गावरील पांढरवाणी फाट्याजवळ ची घटना.

प्रहार सेवक प्रवीण वाघे धावले मदतीला.

Spread the love

प्रतिनिधी- प्रवीण वाघे (दि,४ नोव्हेंबर)

नेरी खांबाडा मार्गावरील पांढरवाणी फाट्याजवळ आज सायंकाळी 7.30 ते 8 वाजता च्या दरम्यान एका दुचाकीस्वराने पायी चालणाऱ्या इसमाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सहित इसम गंभीर जखमी झाले असून दोघेही नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.
साविस्तर वृत्त असे की सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथील कमलाकर सावसाकडे वय 35 वर्षे हे सायंकाळी 6 वाजता दुचाकीने चिमूर समोरील शेंडेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाले असता नेरीजवळील पांढरवाणी फाट्याजवळ अंदाजे आठ वाजता दरम्यान पायी चालणाऱ्या इसमाला मागून जोरदार धडक दिली, यात दुचाकी स्वार सहित इसम गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ नेरी येथील प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी दोन्ही जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले सदर जखमींची प्रकृती ही धोक्याच्या बाहेर असल्याचे वृत्त कळले असून वृत्त लिहिपर्यंत नेरी येथील पायी चालणाऱ्या जखमी इसमाचे नाव कळू शकले नाही.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button