गडचिरोली : तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त उद्या,भव्य शोभायात्रेचे आयोजन

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ५ मार्च )
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी गडचिरोली येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता शिवसेना कार्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली येथून या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात येणार असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या शोभायात्रेत सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा युवा अधिकारी पवन गेडाम यांनी केले आहे.
