जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा

आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२९ सप्टेंबर २०२६)

आजाद समाज पक्ष, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर लढा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी याबाबत या संमेलनात सविस्तर चर्चा करण्यात आली.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी तसेच विशेष अतिथी म्हणून ॲड. कैलास जाधव, देवाभाऊ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, जिल्हा महासचिव अंकुश कोकोडे, जिल्हा संघटक हंसराज उराडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विवेक खोब्रागडे होते.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी
!!
भारत कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा मुद्दा संमेलनात मांडण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्च, बाजारभाव, सिंचन, पीकविमा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रश्नांना विधिमंडळात अधिक संघटित प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करण्याचा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून पदवीधर मतदारांना आपल्या प्रतिनिधीची निवड करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, त्याच धर्तीवर नोंदणीकृत शेतकरी आयडीधारकांना मतदानाचा अधिकार देऊन शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आमदार निवडण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सदर ठराव आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

गावागावात ‘प्रतिसरपंच’; पहिल्या टप्प्यात ३५ नियुक्त्या
!!
ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, ग्रामविकासातील अनियमितता व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनतेचा सजग प्रतिनिधी म्हणून ‘प्रतिसरपंच’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी सांगितले.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंच नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये वाकडी येथील विजय देवतळे, मार्कंडा येथील रत्ना सरपे, येडानूर येथील नितेश पोटावी, विहीरगाव येथील मुकेश सहारे, मालेवाडा येथील संतोष मोहुर्ले, बांधगाव येथील भास्कर वट्टी यांच्यासह विविध गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

आरोग्य व शिक्षणासाठी हेल्पलाईन
!!
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन नंबर लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

शासकीय रुग्णालयातील समस्या, उपचारातील अडचणी, आरोग्यसेवेतील त्रुटी, शाळा व शिक्षकांशी संबंधित प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारी पक्षाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या हेल्पलाईनचा उपयोग केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा व तालुका पातळीवर नवीन नियुक्त्या
!!
संघटनात्मक विस्ताराला गती देताना विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी करण्यात आल्या.

सतीश कुसराम – जिल्हा कार्याध्यक्ष
तुषार रामटेके – जिल्हा प्रवक्ते
मारोती येलावार – चामोर्शी तालुकाध्यक्ष
सुरेश पवार – चामोर्शी तालुका उपाध्यक्ष
आकाश दुर्गे – चामोर्शी तालुका सचिव
पितांबर हर्रो – कुरखेडा तालुका उपाध्यक्ष
नितेश गृरुनुले – मालेवाडा क्षेत्र प्रमुख
रंजित बांबोळे – धानोरा तालुका कार्याध्यक्ष
उमेश तिम्मा – एटापल्ली तालुकाध्यक्ष

यासह विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची जोरदार तयारी
!!
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आजाद समाज पक्ष नियोजनबद्ध पद्धतीने आणि संघटनात्मक ताकदीने लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी स्पष्ट केले.

यासाठी प्रत्येक गावात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. तसेच आगामी निवडणुकांमध्ये तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी पक्षाची आगामी कार्यपद्धती, संघटन विस्तार आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शासकीय सेवेत निवड झालेल्या सहकाऱ्यांचा सत्कार
!!
आजाद समाज पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड आणि शुभम पाटील यांची नुकतीच शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तसेच पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शिल्ड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, गडचिरोली विधानसभा प्रमुख धनराज दामले, धानोरा तालुकाध्यक्ष किशोर उसेंडी, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, भामरागड तालुकाध्यक्ष महेंद्र उसेंडी, महिला आघाडीच्या तारका भडके, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सतीश दुर्गमवार, नितेश वेस्कडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button