जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली :जपतलाई अनुदानित आश्रमशाळा सर्पदंशप्रकरणी दोन अधिकारी निलंबित

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२३ ऑगस्ट २०२६)

एकात्मिक आदिवासी विकासप्रकल्पांतर्गत येणाऱ्या जपतलाई येथील आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या रात्री ३ विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अत्यंत गंभीर प्रकरणात आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आदिवासी विकास विभागाने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) प्रभू सादमवार, आणि शिक्षण विस्तार संतोष कन्नाके यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

नागपूरच्या अपर आयुक्त, आदिवासी विकास आयुषी सिंह, भा.प्र.से. यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button