जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : जपतलाई सर्पदंश प्रकरणी संस्थाध्यक्ष, सचिव पिता-पुत्रासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१३ ऑगस्ट)

संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याला सुन्न करून टाकणाऱ्या धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रम शाळेतील तीन मुलीच्या सर्पदंश मृत्युप्रकरणी संस्थाध्यक्ष व माजी खासदार मारोतराव कोवासे, संस्था सचिव विश्व्जीत कोवासे या पिता- पुत्रासह या प्रकरणात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू पुन्या सादमवार यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

पोलीस नोंदीनुसार, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार (वय ५१ वर्षे), महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिंल्लमवार (वय ३४ वर्षे) आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर (वय ५० वर्षे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस नोंदीत जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता घटना घडल्याचे नमूद आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप नोंदीत नमूद असून, सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३(५) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ मधील कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button