जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : जपतलाई अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १२ ऑगस्ट)

शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलेल्या तीन आदिवासी विद्यार्थिनींचे सर्पदंशाने बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

आश्रमशाळेत मूलभूत सुविधा, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था नसतानाही तपासणी करून शाळेला पात्र ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी संस्थाचालकाविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button