शिर्डीत अभिनेत्री किरण वाघ यांचा ‘साई प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरव
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते सन्मान

लोकशाही न्युज,शिर्डी (दि. ४ जुलै)
शिर्डी येथे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पत्रकार व अभिनेत्री किरण वाघ यांना ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते ‘साई प्रेरणा गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सुदाम संसारे यांनी केले होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, पत्रकार आणि साईभक्तांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर किरण वाघ यांनी आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानत, भविष्यातही समाजहितासाठी व पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक कार्य सुरू ठेतण्याचा निर्धार व्यक्त केला.
किरण वाघ यांचे कार्य प्रेरणादायी
!!
पत्रकारिता तसेच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत जनजागूतीचे महत्पूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची ही दखल प्रेरणादायी ठरली आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कलाकार, पत्रकार व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन व व्यवस्थापन यांचे सर्वत्र कौतुक झाले.
