जाहिरात
ताज्या घडामोडी

कंपनी च्या नावे आर्थिक फसवणूक करणाऱ्या पिपरे दाम्पत्यावर मकोका लावा

सहाय्यक पोलीस अधीक्षकाकडे पीडित महिलांची तक्रार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २ जुलै)

जिल्हाधिकारी यांचे बनावट लेटरहेड व बनावट सही करून ४ कोटीची कामाची लूट करण्याच्या आरोपाखाली ५ दिवसाच्या पोलीस कस्टळीत असणाऱ्या आशिष पिपरे यांच्या विरोधात चामोर्शीतील महिलांनी पुन्हा मकोका लावण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. या तक्रारीमुळे आशिष पिपरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.

चामोर्शी येथील स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे व नगरसेविका सोनाली आशिष पिपरे यांनी खोटया कंपन्या शिवम एंटरप्राईजेस, शिवम इंडस्ट्रिज या कंपण्या स्थापन करून सन २०२० मध्ये प्रधान निर्मीती रोजगार योजनेच्या माध्यमातुन पिपरे दाम्पत्यांनी गोर गरीब, शेतकरी, शेतमजूर महिलांची पिळवणूक केली.

याशिवाय या पिपरे दांपत्याने एक ना अनेक कारनामे करून गरीब महिलांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे.सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना तक्रार देते वेळी कविता किरमे,मिनाक्षी पिपरे,देवांगना नैताम, निवृता गवारे ,शिला धोडरे यांचे सह अनेक महिलांनी तक्रार नोंदवली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button