जाहिरात
दुःखद ब्रेकिंग न्युज

गडचिरोली : अमेय सुरेश सावकार पोरड्डीवार यांचे अकाली निधन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ जून)

गडचिरोली शहराचे पहिले नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय सुरेश सावकार यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सकाळी ११ वाजता (दि. १६ जून) दुःखद निधन झाले. ते अवघे ३५ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने गडचिरोली शहरासह सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अमेय सावकार पोरड्डीवार यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालय व त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

अमेय च्या पार्थिवावर आज सायंकाळी कठाणी नदी घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, आई,वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे.

लोकशाही न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली!

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button