गडचिरोली : चार उपसा सिंचन योजनांना मंजुरी
माजी खासदार डॉ. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१८ जून)
गडचिरोली जिल्ह्यातील शेतक-यांना दिर्घकालीन सिंचनाची सोय व्हावी यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्च्याचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्यामुळे सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली व रमेश गुडम मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम व चामोर्शी तालुक्यातील राजीव चिचडोह आदि चार उपसा सिंचन योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली अशी माहीती माजी खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी झालेल्या (दि. १८ जून) ला पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांनी कॅबिनेट च्या बैठकीत चार उपसा सिंचन गडचिरोली
जिल्ह्यासाठी मंजुर केले असल्याची माहिती दिली. गडचिरोली जिल्हा शेवटचा नसुन तो पहिला जिल्हा बनविणार आहेत. सिरोचा तालुक्यातील रंगय्यापल्ली उपसा सिंचनाचा १४ गावाला फायदा होईल. रमेशगुंडम उपसा सिंचनांचा पाच गावाला, राजीव -चिचडोह उपसा सिंचनाचा फायदा १४ गावाला तर शांतिग्राम उपसा सिंचनांचा फायदा १५ गावाला होणार आहे एकंदरीत ९५४३ क्षेत्रात फायदा होणार असुन त्यांचा ४८ गावांना फायदा होईल सदर चारही उपसा सिंचन प्रकल्प ७२२. ९५ कोटीचे प्रकल्प आहेत अशी माहीती माजी खासदार अशोक नेते यांनी दिली.
१. रंगय्यापली (ता.सिरोंचा)उपसा सिंचन योजनेअंतर्गत रायपेठामाल, रंगयापल्ली, अमरावती माल, अमरावती, कारसपल्ली, मेदारामचक, कारसपल्ली माल,मेदाराम माल, रेपेठा,पोचमपल्ली, कोटा पॅच, कोटमाल, दियापल्ली, भोगापूर या गावांना लाभ मिळणार आहे.
२. रमेशगुड्डम (ता. सिरोंचा)उपसा सिंचन योजनेअंतर्गत रमेश गुड्डम, क्रिस्टयापल्ली, कोरला माल,कोरबा, फाजेली या गावांना लाभ मिळणार आहे.
३. शांतीग्राम (ता. मुलचेरा) या उपसा सिंचन योजनेअंतर्गत लगाम चक,कांचनपुर, नागुल्वाही, मच्छीगला, लगाम, शांतीग्राम, तुमरीगुंडा, दामपूर, गीताली, चंदूगट्टा, चेकटोला, टीकेपल्ली, राजापूरपंच, बोरी, रामपूर या गावांचा समावेश आहे.
४. राजीव-चिंचडोह (ता. चामोर्शी) या उपसा सिंचन योजनेअंतर्गत भेंडाळा, रामाळा,फराडा, घारगाव, सगनापूर, दोटकूली, वाघोली, वेलतूर तुकूम,फोकुर्डी, मोहाडी, मोकासा, मार्कंडादेव, कानोली, एकोडा, रमेश या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
पत्रकार परिषदेला ओबिसी महासंघ महाराष्ट्र चे अध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चा सचिवरमेश भुरसे, मानवाधिकार संघटनचे नेते डॉ.प्रणय खुणे, भाजपा उपाध्यक्ष अरुण हरडे, शहर अध्यक्ष व बांधकाम सभापती नगर परिषद अनिल कुनघाडकर, कामगार मोर्चाचे सुधाकर पेटकर, भारत खटी यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
