२० मे ला अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १८ मे)
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसेच कार्पोरेटद्वारे अव्यावसायिक स्पर्धेविरोधात दि. २० मे २०२६ रोजी औषध विकेत्यांचा बंद पुकारला असल्याची माहिती आज दि.१८ मे रोजी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात ४०० हुन अधिक दुकान या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होणार आहेत.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला देवेंद्र सोमनकर जिल्हाधक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गडचिरोली, राजेश ईटनकर सल्लागार समिती प्रमुख, विपुल चन्नावार, चंद्रभान जेणेकर माजी जिल्हाधक्ष, गायत्री सोमनकर महिला प्रमुख उपस्थित होत्या.
औषधी व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 च Rule 1945 अंतर्गत चालवला जातो. ऑनलाईन औषध विकी बाबत Drugs and Cosmetics Act मध्ये कोणतीही तरतुद नाही. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत GSR 817 (E) दि. २८.०८.२०१८ अंतर्गत नोटिफिकेशन जारी केले होते. परंतु त्याचे अद्याय कायद्यात रुपांतर झालेले नसतानाही देशभरात सर्रासपणे बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरु आहे. याबाबत मा. दिल्ली उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल असून मा. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगितीसुध्दा दिलेली आहे. याकडे ही सरकार दुर्लक्ष करीत आहे. संघटनेने सदरहू जीएसआर रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोरोना काळात GSR 220 (E) दि. २६.०३.२०२० काढून सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती. कोरोना संपुन पाच वर्ष उलटल्यानंतर ही सदरहू नोटिफिकेशन वारंवार विनंती करुन ही रद्द करण्यात आलेले नाही. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन कंपन्या स्वतःचे भागभांडवल जाळूत औषध विक्रीचा व्यवसाय करत आहेत तसेच कार्पोरेटद्वार अव्यावसायिक स्पर्धा निर्माण केली जात आहे. ज्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक अडचणीत येत असून ग्रामीण भागातील औषधी वितरण व्यवस्था धोक्यात येऊ शकते.
केंद्र शासनाचे संबंधित विभागाचे मंत्री तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागून ही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संघटनेने नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना ही निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यास ही प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटनेस आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागली व त्याअंतर्गत झालेल्या निर्णयानुसार दि. २० मे २०२६ रोजी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा बंद पुकारण्यात आला आहे.
सरकारने आमच्या समस्यांवर न्याय भुमिका न घेतल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा ठरविण्यात येईल व त्यामुळे जनतेस येणाऱ्या समस्यांना संपुर्णपणे सरकार जबाबदार राहील असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
२० मे रोजी औषध विक्रेत्यांचा बंद आहे. आपात्कालीन परीस्थितीत औषध हवे असल्यास या क्रमांकावर संपर्क करावा.
!!
1.देवेंद्र सोमनकर, गडचिरोली
9404125926
2. सिकंदर चौधरी, वडसा,
8999362844
3. मनोज पत्तीवार, आल्लापली
9421729384
4. प्रकाश दत्ता, मुलचेरा
9421854819
5. चंद्रशेखर बुध्दे, देलनवाडी
9423423513
6. संदिप रायर्लावार, सिरोंचा
9421729671
7. विपुल चन्नावार, गडचिरोली
9423422130
8. रुपेश सकिनलावार, गडचिरोली
9420758834
9. चेतन निपाने, कुरखेडा
9404831332
10. जयश्री पुंडे, गडचिरोली
7020341270
9405132822
12. मनिष येमुलवार, भामरागड
9404438383
13. प्रविण येगोलपवार, अहेरी
9834312833
14. विश्वजीत हलधर, धानोरा
7588772743
15. अश्विन भांडारकर, कुरुड
8975619200
16. अजय आकुलवार, असरअल्ली
9423743327
9421729671
17. संतोष धकाते, आरमोरी
9420973680
18. जितेन्द्र निमसरकार, आष्टी
9284975339
19. संतोष गंधेशिरवार, एटापल्ली
9403116940
20. दिनेश जुवारे, भेंडाळा चामोशी
9588678242
