
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ मे)
गडचिरोली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४. ९१ टक्के लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवत कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम प्रज्ञा देवेन्द्र फुलझेले ७७. ३३ टक्के गुण मिळविले द्वितीय चांदनी दिगांबर मडावी ७६.८३ टक्के मिळविले तर तृतिय कृ छकूली विनाजी मेश्राम ७४.३३ टक्के गौरी कविंद्र मस्के ७३.६७ टक्के गुण मिळविले व राणी दुर्गावतीचे नाव लौकीक केले या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थीनीचे संस्थेचे अध्यक्ष आदिवासी सेवक घनश्यामजी मडावी संस्थेच्या पदाधिकारी सौ सरोजताई मडावी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. वैशाली प्रविण मडावी, प्रा. देवानंद कामडी प्रा. संध्या येलेकर, कु सुनिता चुथरी शिक्षीका, सौ. सोनाली शेटये शिक्षिका, धनराज ठेमरकर, आनंतराव गाडयगडे, दिवाकर जल्लेवार, सतिश मडावी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन कैले आहे.
