जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी उदय धकाते, तिलोत्तमा समर हाजरा यांची निवड

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ४ जानेवारी)

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे.या नव्या कार्यकारिणीत जिल्ह्यातील विविध वृत्तसंस्था व न्यूज पोर्टलच्या संपादकांचा समावेश करण्यात आला आहे. ही निवड पत्रकार संघटनेला अधिक सक्षम आणि प्रभावी बनवणारी ठरणार आहे. या निवड प्रक्रियेत महाभारत न्यूज पोर्टलचे संपादक उदय धकाते यांची संयोजक पदी फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच ग्लोबल गडचिरोली न्यूजच्या मुख्य संपादिका तिलोत्तमा समर हाजरा यांची संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.दोन्ही नवनियुक्त संयोजकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

विविध वृत्तसंस्था तसेच सोशल मीडियावरील न्यूज पोर्टलच्या संपादकांचा या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला असून, पत्रकार संघटनेच्या बळकटीसाठी ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.सभासद म्हणून पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.गडचिरोली वार्ता संपादक जयंत निमगडे,आज तक चॅनेल चे जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार, गोंडवाना टाईम्स मुख्य संपादिका अस्मिता दुडमवार,एस भारत न्यूजचे संपादक प्रा.श्रीमंत सुरपाम,एव्हीबी न्यूजचे संपादक अनिल बोदलकर,लोकवृत्तचे निलेश सातपुते,के विदर्भ न्यूजचे सुरज हजारे,लोक प्रवाहचे किशोर खेवले,न्यू प्राणहिता न्यूजचे कृष्णा वाघाडे,विदर्भ क्रांती न्यूजचे मुक्तेश्वर मशाखेत्री,गडविश्वचे हिताश्री जिवतोडे आणि वृत्तवाणीचे प्रविण चन्नावार नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न, हक्क, स्वातंत्र्य व सुरक्षितता यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पत्रकारांमध्ये समन्वय, एकजूट आणि व्यावसायिक मूल्यांची जपणूक करत लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्याचा संकल्प नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. या नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button