गडचिरोली : प्रेस क्लबतर्फे मंगळवारी साजरा होणार पत्रकार दिन
अझीझ हमीद नाथानी यांचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने होणार सन्मान

गडचिरोली : प्रेस क्लबतर्फे म
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ४ जानेवारी)
पत्रकारीतेच्या क्षेत्रात अग्रेसर गडचिरोली प्रेस क्लब संघटनेच्या मंगळवार (दि.६) आचार्य बाळशाश्त्री जांभेकर जयंती दिनी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अझीझ हमीद नाथानी यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी ५:३० वाजता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात काॅंग्रेसचे विधी मंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार तसेच मान्यवरांच्या हस्ते अझीझ नाथानी यांचा गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे राहतील.
विशेष पाहुणे म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराधक्ष प्रणोती निंबोरकर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशान्त बोकारे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, नागपुरच्या टाॅईम्स आॅफ इंडियाचे पार्थ मैत्र, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच पत्रकार दिनानिमित्त गडचिरोली प्रेस क्लब भवनात गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवारी सकाळी १०:३० वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना संध्याकाळी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येईल.
या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लब अध्यक्ष मिलिंद उमरे, सचिव शेमदेव चाफले, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सदस्य रोहिदास राऊत, निलेश पटले, नंदकिशोर काथवटे,मनोज ताजने, सुरेश पद्मशाली, सुरेश नगराळे, विलास दशमुखे सहयोगी सदस्य विनोद बदखल, गणेश शिंगाडे, इरफान शेख, आशीष अग्रवाल, मनीष रक्षमवार, ओमप्रकाश चुनारकर, संदीप कांबळे आदींनी केले आहे.
