जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : आमदार मिलिंद नरोटे व डॉ. प्रणय खुणे यांचे हस्ते डान्स क्लास व मॉडेलिंग सेंटर चे भव्य उदघाट्न

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ४ जानेवारी)

दि. २ जानेवारी २०२६ गडचिरोली येथील खरपुंडी नाक्या समोर सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषद शाळा शिक्षक जगदीश पाटील मडावी,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी यांचे भव्य निवासस्थान वास्तुपूजन व मुलीचे नामकरण निमित्ताने अतिदुर्गम, आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गोरगरीब, शोषित, वंचित,आदिवासी एससी,एसटी,ओबीसी व सर्वसाधारण,समाजातील युवक युवती नागरिक यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ, मिलिंद नरोटे व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या शुभ हस्ते भव्य डान्स क्लास व मॉडेलिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थिताना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. प्रणय खुणे यांनी मार्गदर्शन केले व यावेळी धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्ना यांच्या वायरल गाण्यावरील डान्स प्रस्तुत करून भव्य शुभारंभ करण्यात आले, यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चातगाव येथील सरपंच गोपाल पाटील उईके ,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, भाजपा नेते अनिल पोहनकर, रमेश भूरसे, अविनाश विश्रोजवार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानूभाऊ उपाध्ये, तालुका सचिव दिनेश भाऊ मुजुमदार, महिला आघाडी नेत्या लीना ताई विश्वास व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button