
लोकशाही न्युज,सावली (दि.२२ डिसेंबर)
जय शिवराजे युवा क्रिकेट क्लब, केशरवाही यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य टेनिस बॉल अंडर आर्म रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा केशरवाही येथे होणार आहे.ही क्रिकेट स्पर्धा “एक गाव – एक टीम” या संकल्पनेवर आधारित असून रविवार दि.२५ डिसेंबर २०२५ पासून अंतिम सामन्यापर्यंत मु. केशरवाही ता. सावली जि. चंद्रपूर येथील, विनोद झाडे यांच्या भव्य पटांगणावर आयोजित करण्यात येणार आहे.खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव देणे व गावोगावी क्रीडासंस्कृती रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी
!!!
१ हजार तर तक्रार फी २ हजार निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी संघांसाठी आकर्षक बक्षिस
!!
प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये
द्वितीय बक्षीस २१ हजार रुपये व तृतीय बक्षीस ११ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क साधण्याचे मंडळाचे आवाहन
!!
७४९९७१८१३६, ७२६३८८६३९६,
७४९९१३८२५०,
९३२२३८५६६३
या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून रोहित बोम्मावार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संस्थापक, अध्यक्ष साथ फाउंडेशन , सहउद्घाटक म्हणून देविदास बानबले कार्यकर्ता भाजपा, सावली,अध्यक्ष म्हणून जितू धात्रक संचालक, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डिलर तथा तालुका कोषाध्यक्ष, भाजपा, उपाध्यक्ष म्हणून किशोर वाकुडकर अध्यक्ष, सावली तालुका भाजपा दीपप्रज्वलन अंकुश भोपये सावली तालुका महामंत्री, भाजपा दीपप्रज्वलन निखिल सुरमवार युवा कार्यकर्ता सावली यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी परिसरातील सर्व क्रिकेट संघ, खेळाडू, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
