गडचिरोली : नगराध्यक्षपदी भाजपच्या ॲड. प्रणोती निंबोरकर यांचा ४८३९ मतांनी एकतर्फी विजय

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२१ दिसेंबर)
नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) या ४८३९ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ११७६२ मते मिळाली.त्यांच्या विरोधात उभे असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अश्विनी रवींद्र नैताम यांना ६९२३ मते मिळाली तर काँग्रेस कडुन उभे असणाऱ्या कविता सुरेश पोरडीवार यांना ६०९४ मते मिळाली. कृषी महाविद्यालय येथे झालेल्या मत मोजणीत त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करीत दणदणीत विजय खेचून आणला आहे.
२१ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी आयटीआय चौक परिसरात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली.त्यांच्या विजयाची घोषणा होताच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून एकच जल्लोष केला.व विजयी रॅली चे आयोजन सुद्धा केले.
ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, नवनियुक्त नगराध्यक्षा
नगर परिषद गडचिरोली
!!!
नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी जनतेचे आभार मानले. “हा विजय माझा नसून प्रत्येक गडचिरोलीकराचा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे.अशी प्रतिक्रिया लोकशाही न्युज ला दिली.
गडचिरोली नगर परिषदेत २७ जागांपैकी भारतीय जनता पार्टीचे १५ नगरसेवक,काँग्रेस चे ६ नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ५ नगरसेवक व बहुजन वंचीत आघाडी चा १ उमेदवार विजयी झाला आहे.
भाजपा चे विजयी उमेदवार
!!
–प्रभाग क्रमांक २
भाजपाचे हर्षल गेडाम व भाजपा ची कोमल नैताम
–प्रभात क्रमांक ३
भाजपा ची योगिता पिपरे व भाजपा चे अनिल कुणघाडकर
–प्रभाग क्रमांक ४
भाजपा ची वर्षा शेडमाके विजयी
–प्रभाग क्रमांक ५
भाजपा ची सिमा कन्नमवार (कोसे)
–प्रभाग क्रमांक ६
भाजपची ज्ञानेश्वरी धंदरे विजयी
–प्रभाग क्रमांक ८
भाजपा शेखर आखाडे व भाजपाची शिल्पा हेमके विजयी
–प्रभाग क्रमांक ९
भाजपा चे मुकतेशर काटवे व भाजपा ची सौ.मारभते विजयी
–प्रभाग क्रमांक १०
भाजपा ची श्रीमती निंबोड व भाजपा मडावी विजयी
–प्रभाग क्रमांक १२
भाजपा निखिल चरडे व भाजपा ची साक्षी बोलूवार विजयी
काँग्रेस चे विजयी उमेदवार
!!
–प्रभाग क्रमांक १
काँग्रेस चे पराग पोरड्डीवार व काँग्रेस ची मनीषा खेवले विजयी
–प्रभाग क्रमांक ४
काँग्रेस चे श्रीकांत देशमुख विजयी
–प्रभाग क्रमांक ५
काँग्रेस चे सतीश विधाते विजयी
–प्रभाग क्रमांक ६
काँग्रेस चे रमेश चौधरी विजयी
–प्रभाग क्रमांक ७
काँग्रेस ची मेघा वरगंटीवार विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विजयी उमेदवार
!!
— प्रभाग क्रमांक ७
राष्ट्रवादी काँग्रेस चे रवि मेश्राम विजयी
— प्रभाग क्रमांक ११
राष्ट्रवादी काँग्रेसचे लीलाधर भरडकर व राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिभा कुमरे विजयी
— प्रभाग क्रमांक १३
राष्ट्रवादी काँग्रेस ची माधुरी मंगरे व राष्ट्रवादी काँग्रेस ची अंजुम माजिद सय्यद विजयी
बहुजन वंचित आघाडी चे बाळू टेंभुर्णे विजय झाले आहेत.
