जाहिरात
ताज्या घडामोडी

पहिल्यांदाच अभाविप चे ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन ९ ते ११ जानेवारी ला गडचिरोलीत

विदर्भातील ५०० विद्यार्थी प्रतिनिधी होणार सहभागी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१९ डिसेंबर)

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे ५४ वे प्रांत अधिवेशन दि. ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी सुमानंद सभागृह नागपूर रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती विदर्भ प्रांत मंत्री सुश्री पायल किनाके यांनी आज (दि. १९ डिसेंबर) ला  प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेतुन दिली.

हे अधिवेशन विदर्भ प्रांताच्या युवा तरूणाईला नवी उर्जा व दिशा देणारे ठरेल. या अधिवेशनात विदर्भाच्या १२० तालुके व ११९ मोठे सेंटरवरून एकूण असे २३९ स्थानांवरून ३५० महाविद्यालयातून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत. या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्पासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील.

गडचिरोलीतील पावनभूमिवर पहिल्यांदाच विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन विदर्भ प्रांताचे ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहेत, तसेच हे वर्ष भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मजयंतीचे १५० वे वर्ष असल्याने त्यांच्या जन्मस्थळ म्हणजे झारखंड मधील उलिहातू इथून आणलेले मातीचे कलश घेऊन अभाविप विदर्भात तीन यात्रा काढतील त्यात बुलढाणा जिल्यातील सिंदखेड राजा, अचलपूर जिल्ह्यातील धारणी व गोंदिया जिल्ह्यातील कचरगड येथून जनजाती गौरव यात्रा काढणार आहे व त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणार आहे ही यात्रा तारखेला सायंकाळी पर्यंत गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा नगर येथे पोचतील, अधिवेशनाच्या भूमीला भगवान बिरसा मुंडा नगर असे नाव देण्यात येणार आहे. अधिवेशन दरम्यान भव्य शोभा पात्रा काढण्यात येणार आहे. ज्यामध्ये विदर्भातील विविध जिल्हयांच्या माध्यमातून वैदर्भीय संस्कृतीचे दर्शन होईल. या शोभा यात्रेचा शेवट जाहीर सभेने होणार आहे. या जाहीर सभेच्या मंचावरून विदर्भ प्रांतातील छात्रनेते विविध विषयांवर भाषण देणार आहेत.

या अधिवेशनाच्या स्वागत समितीत डॉ. मिलिंद नरोटे स्वागत समिती अध्यक्ष असतील स्वागत समिती उपाध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर, प्रचीत पोरेड्डीवार, तर स्वागत समिती सचिव गोविंद सारडा, सहसचिव प्रमोद पिपरे व अनिल पोहणकर, कोष प्रमुख प्रशांत भूगवार असतील. त्याचप्रकारे या स्वागत समितीचे संरक्षक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गडचिरोव जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, माजी खासदार डॉ. अशोक नेते, अॅड. प्रमोद बोरावार, आमदार धर्मराव आत्राम कीर्तिकुमार भांगडिया, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, डॉ. नामदेव हुसेंडी इतर मान्यवर संरक्षण समिती व स्वागत समिती सदस्य असतील.

युवा म्हणजे भविष्यातील भावी नेतृत्व आणि ते नेतृत्व या अधिवेशना दरम्यान विदर्भाच्या कानाकोप-यातून गडचिरोली ला येणार आहेत. ही गडचिरोलीकरांना लाभलेली मोठी संधी आहे. या संधीचे सोने करून विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनावर येणा-या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे गडचिरोलीकरांनी स्वागत करावेत व अधिवेशनाला भरभरून सहकार्य द्यावेत असे आवाहन गडचिरोलीतील जनतेला करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत मंत्री सुश्री पायल किनाके, गोविंद सारडा स्वागत समिती सचिव, सुनीता साळवे, संकेत म्हस्के नगर मंत्री, करण चौधरी जिल्हा मीडिया संयोजक हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button