गडचिरोली : प्राईम हॉस्पिटल येथे प्रथमच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
रुग्णाला पुन्हा मोकळे चालणे शक्य

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१६ डिसेंबर)
६२ वर्षीय महिलेला गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र रुमॅटॉइड आर्थ्रायटिसचा त्रास होता. गुडघ्यांमधील वेदना वाढल्यामुळे तिला चालणे-फिरणे अशक्य झाले होते व गुडघ्यावर शस्त्रक्रिया करने गरजेचे झाले होते.सदर शस्त्रक्रिया ही १० डिसेंबर रोजी अस्थिरोग तज्ञ डॉ. मयुर नन्नावरे व भूलतज्ञ डॉ. मित्तल गेडाम यांनी केले. या ऑपरेशन करिता रुग्णालयाचे संचालिका डॉ. जयश्री देवगडे, डॉ. वैभव तातावार, फिजिओथेरपिस्ट डॉ. गायत्री माधमशेट्टीवार यांचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने दुसऱ्याच दिवशी चालण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही आठवड्यांत फिजिओथेरपीद्वारे ती संपूर्णपणे स्वावलंबी होईल.
गडचिरोली शहरातील मध्यभागी चंद्रपूर रोड वर असलेल्या प्राईम हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदाच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ) म्हणजे काय
!!!
टोटल नी रिप्लेसमेंट (TKR) ही गुडघ्याच्या सांध्यातील खराब, झिजलेले किंवा विकृत झालेले भाग काढून टाकून त्याऐवजी कृत्रिम सांधा (इम्प्लांट) बसवण्याची शस्त्रक्रिया आहे.
या शस्त्रक्रियेची गरज कधी
!!!
खालील परिस्थितींमध्ये तक्रार ची आवश्यकता भासू शकते.
–ऑस्टिओआर्थ्रायटिस (वयोमानानुसार होणारी गुडघेदुखी)
— रुमॅटॉइड आर्थ्रायटिस (संधिवाताचा गंभीर प्रकार)
— गुडघ्यातील तीव्र वेदना – चालणे कठीण होणे
— बसणे, उभे राहणे, पायऱ्या चढणे यात त्रास
— कडकपणा, सूज, पाय आखडून जाणे
— औषधे, फिजिओथेरपी व इंजेक्शनं उपयोगी न ठरणे
शस्त्रक्रियेनंतर काय सुधारणा होते
!!!
— वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात,हालचाली सुधारतात,
पाय सरळ व स्थिर होतो,चालणे, पायऱ्या चढणे सोपे होते,जीवनमान सुधारते – सक्रिय जीवन पुन्हा शक्य.
