जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

वाघ व बिबट झटापटीत बिबट्याचा मृत्यू

Spread the love

गडचिरोली (दि,२६ जून)

गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गडचिरोली बिटामधील कक्ष क्रमांक १७१ मध्ये बिबट वन्यप्राण्याची मृत शरीर आज दिनांक २६ जून २०२२ रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास वनकर्मचान्यास गस्ती दरम्यान आढळून आले. माहिती मिळाल्यावरुन श्री. मिलिश दत्त शर्मा, उप वनसंरक्षक, गडचिरोली यांचे मार्गदर्शना खाली श्री. सोनल भडके, सहायक वनसरक्षक, गडचिरोली वनविभाग व श्री. अरविंद पेंदाम, वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली (प्रादे.), श्री. श्रीकांत नवघरे, क्षेत्रसहायक, गडचिरोली, श्री. बि.पी. राठोड, वनरक्षक, गड़चिरोली, श्री. भसारकर, वनरक्षक बोदली, श्री. गौरव हेमके, वनरक्षक, चांदाळा व वाघ संनियंत्रक पथक, गडचिरोली व अधिनस्त संपुर्ण वनाधिकारी / कर्मचारी यांनी घटना स्थळावर जाऊन पाहणी केली असता, सदर घटनास्थळ कक्ष क्रमांक १७१ मधील वाकडी गावालगतच्या झुडपी जंगलात घडली असून मौका स्थळाची पाहणी केली असता, मृत बिबटच्या शरीरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आले तसेच मृत शरीर असलेल्या आजुबाजुच्या परिसरात पटटेदार वाघाचे पाऊलखुना आढळुन आल्या तसेच जवळच पटटेदार वाघ व बिबट यांच्यात झुंज झाल्याचे निशान दिसुन आले. त्यामुळे सदर बिबट वन्यप्राणी हा वाघाच्या हल्ल्यात मृत झाल्याचे प्रथम दर्शनी अंदाज आहे. सदर प्रकरणात शवविच्छेदन करण्याकरीता पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१, येवली डॉ. चेतन नंदनवार व पशुधन विकास अधिकारी श्रेणी-१, गुरखळा डॉ. श्रध्देय सिरणकर हे उपस्थीत होते. दोनही अधिकाऱ्यांनी मृत शरीराची शवविच्छेदन करून रासायनिक तपासणी करीता नमुने घेतले आहे. मृत बिबटयाच्या शरीरावरील जखमावरुन पटटेदार वाघाने हल्ला करुन बिबटयास ठार केल्याचे प्राथमिक अंदाज डॉ. चेतन नंदनवार व डॉ. श्रध्देय सिरणकर यांनी व्यक्त केला. सदर संपूर्ण कार्यवाहीत वन्यजीव मानद रक्षक श्री. मिलींद उमरे व वन्यजीव प्रेमी श्री. अजय कुकडकर तसेच ग्रामपंचायत वाकडी येथील सरपंच सौ. सरिता भास्कर चौधरी व पोलीस पाटील श्री. देवेंद्र केशव वाकडे हे सुध्दा उपस्थीत होते. मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून मृत शरीरास अग्नी देऊन उपरोक्त सर्वांसमक्ष नष्ट करण्यात आले.

सदर प्रकरणावरुन वाघ व बिबट यांच्यात झुंज झाली असल्याने वाघ सुध्दा यात जखमी झालेला असावा असे प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला असुन घटना स्थळाच्या आजुबाजुच्या जंगल परिसरात गावकन्यांनी जाऊ नये व आपले पाळीव प्राणी सुध्दा या भागातील जंगलात नेऊ नये असे आव्हान मा. सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली श्री. सोनल भडके तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली श्री. अरविंद पेंदाम यांनी केलेले आहे. सदर घटनेची चौकशी मा. उप वनसंरक्षक श्री. मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनात मा. सहायक वनसंरक्षक श्री. सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी, गडचिरोली श्री. अरविंद पेंदाम हे करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button