गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज चे स्वप्न होणार पूर्ण
आ. डॉ देवरावजी होळी यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन
(दि,५ जुलै)
मा. मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेऊन जिल्ह्यात प्रथमतः मेडिकल कॉलेज उभारण्याची केली मागणी
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे प्रथम प्राधान्याने मंजूर करावे त्यानंतर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चा विचार करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे दिले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १०० टक्के होईल याबाबत आमदार महोदयांना आश्वस्त केले .
गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्र्यांच्या व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आग्रह करीत आहेत. त्यांनी जिल्ह्यात प्रथम मेडिकल कॉलेजची आवश्यकता का आहे हे पटवून6 देण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. गडचिरोली येथे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यापूर्वी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. आपल्या मागणीची नक्कीच दखल घेतल्या जाईल असे आश्वासन देत आमदार महोदयांना गडचिरोली जिल्ह्यात १००% मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात येईल याबाबत आश्वस्त केले. यावेळी आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले .
