शिवकल्याण संस्था व काँग्रेस च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण
चामोर्शी (दि,५ जुलै)
६ ते १४ वयोगटातील कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये प्राथमिक शिक्षण हे सर्वांचा अधिकार आहे आणि त्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून Zero Draft मिशन सूर करण्यात आले असून, या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे प्रोत्साहन देण्याकरिताछोटासा प्रयत्न म्हणून चामोर्शी तालुक्यातील जि.प. उच्च प्राथमिक शाळा वालसरा येथे शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण करून शाळेत स्वागत करण्यात आले. नोटबुक वितरन व शाळेतील अन्य स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच शाळेची ओढ निर्माण होईल व कोणताही विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही. असा विश्वास संस्थाध्यक्ष अनुप कोहळे यांनी व्यक्त केला.
यावेळी वालसरा ग्रामपंचायत चे सरपंच अरुण मडावी, मुख्याध्यापक महेंद्र वासेकर, शिवकल्याण संस्थेचे सदस्य जितेश शेट्टीवार, शिक्षक वडेट्टीवार सर,गायकवाड सर,गावातील युवक नीरज कोहळे, गणराज चीचघरे, काँग्रेस कार्यकर्ते संदीप कोपुलवार, काशीनाथ चीचघरे, वसंत कोहळे, रितेश कुकडकर, ज्योती शेट्टीवार सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
