जाहिरात
गडचिरोलीराजकीय

वंचित बहुजन आघाडी तहसिल कार्यालय समोर करणार उपोषण

गडचिरोली शहरातील बेघर व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे देण्याची मागणी

Spread the love

गडचिरोली (दि,६ जुलै)
गडचिरोली शहरातील बेघर व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टे द्या अन्यथा आठ दिवसानंतर तहसिल कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील बेघर व अतिक्रमण धारकांसहीत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे अल्टिमेटम तहसिलदारांना निवेदनातून वंचित बहुजन आघाडीच्या वतिने देण्यात आले आहे.
तहसिलदार महेंद्र गणविर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली शहरात ग्रामपंचायत असतांना सन १९८० – ८१ व सन १९८१-८२ मध्ये बेघर लाभार्थ्यांना गोकुलनगर येथील शासकीय जागेवर शासनाकडून १३१ घरे बांधून देण्यात आले होते, त्यापैकी केवळ आठ – दहा लाभार्थ्यांना तत्कालीन तहसिलदार गडचिरोली मार्फत जागेचे पट्टे देण्यात आले होते व उर्वरित लाभार्थ्यांना नंतर पट्टे देऊ असे सांगण्यात अाले. परंतु गेल्या चाळीस वर्षांपासून बेघर लाभार्थ्यांना जागेचे पट्टे मिळाले नसल्याने शासनाच्या अनेक योजनापासून वंचित राहावे लागत आहे, गडचिरोली शहरात सन २०१९- २० मध्ये १३०० घरकुलाची योजना असतांना सुद्धा जागेचे पट्टे अभावी घरकुलाच्या योजनेला मुकावे लागत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतिने वांरवार निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आले असता विद्यमान तहसिलदार यांनी संबंधीत विभागाकडून कोणत्या वर्षी बेघर बांधून देण्यात आले त्याचे दस्ताऐवज आणून द्या असे सांगितले, संबंधित विभाग नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांचेशी पत्र व्यवहार केले असता कोणकडेही दस्ताऐवज उपलब्ध नसल्याचे पत्र देण्यात आले, मग प्रश्न असा पडतो की, शासनाने बांधून दिलेले बेघर अाकाशातून टपकले कां? आठ – दहा लाभार्थ्यांना जागेचे पट्टे तत्कालीन तहसिलदार यांनी दिले मग आम्हाला कां नाही? आठ – दहा लाभार्थ्यांना दिलेले पट्टे तहसिलदार मार्फत देण्यात आले असल्याने उर्वरीत लाभार्थ्यांना सुद्धा तहसिलदारांनीच जागेचे पट्टे द्यावे व सोबतच गेल्या पंचविस – तिस वर्षापासून अतिक्रमण करून घरटॅक्स भरत असलेल्या सर्व अतिक्रमण धारकांना सुद्धा जागेचे पट्टे देण्यात यावे अन्यथा आठ दिवसानंतर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीच्या वतिने देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा महासचिव योगेंद्र बांगरे, संदिप गेडाम, भोजराज रामटेके, तुळशिराम हजारे, राहुल भांडेकर, रेखाताई भांडेकर, अर्चणा आबोरकर, योगिता रणदिवे संदिप सहारे आदि उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button