जाहिरात
दैनंदिन बातम्या

१७ जुन ला ‘शेकाप’ ची जिल्हास्तरीय सभा,नवीन कार्यकारिणी निवडीवर होणार चर्चा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१४ जून)

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करुन पक्ष विस्तार करण्यासंबंधात चर्चा करण्यासाठी शनिवारी १७ जूनला पक्ष सभासदांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

स्थानिक प्रेस क्लब सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेत शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन जिल्हा व तालुका समित्यांचे सदस्य निवडीवर चर्चा करण्यात येवून मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यासोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका लढण्यासंबंधाने पक्षाचे स्थानिक स्तरावरची भूमिका आणि नियोजन ठरविण्यात येणार आहे.

त्यामुळे पक्षाचे गाव शाखेचे चिटणीस, खजिनदार, सहचिटणीस आणि सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button