जाहिरात
चामोर्शी

चामोर्शी येथील महाडायलिसिस केंद्राचा लाभ घ्यावा

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची केंद्राला भेट

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी ( दि.५ ऑगस्ट)

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका येथे महाडायलीसिस केंद्राचे सुरुवात गेल्या एक वर्षांपासून सुरु आहे,अनेक रुग्ण जे किडनीचे व्याधीने ग्रस्त आहेत त्यांना आपल्या किडनीच्या व्याधी निराकरणासाठी आधी जिल्ह्यात जाऊन आपला डायलीसिस करावा लागत होता.

जिल्ह्यात एकच डायलीसिस केंद्र असल्यामुळे रुग्णांची फार मोठी फरफट होत होती परंतु आता राज्य सरकारने तालुका स्तरावर सदर महाडायलिसिस केंद्राची सुरवात केली आहे. या महाडायलिसिस केंद्रात मोफत डायलीसिस करण्यात येते व रक्त वाढीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत व सदर केंद्र सर्व सुविधा युक्त आहे या महाडायलिसिस केंद्रात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा सचिव प्रकाश भाऊ थुल यांनी सदिच्छा भेट दिली व या केंद्राची सविस्तर माहिती जाणून घेतले.

या केंद्राचे प्रभारी राहुल रामटेके यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली या केंद्रात दररोज दहा पंधरा रुग्ण येत आहेत तसेच ४३ रुग्ण नियमित आहेत व नागरिकांनी या मोफत महाडायलिसिस केंद्राचा लाभ घ्यावा असे राष्ट्रीय आवाहन मानवाधिकार संघटनेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button