विधान परिषद आमदार डॉ.परिणय फुके यांच्या “त्या” वक्तव्याचा शिवसेनेने केला निषेध

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ५ ऑगस्ट)
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार परिणय फुके महाराष्ट्र राज्य यांनी वर्धेतील एका जाहीर सभेत शिवसेनेचा बाप मीच असे विधान केले होते. या वक्तव्याचा गडचिरोली शिवसेना (शिंदेगट) तर्फे आज (दि.५ ऑगस्ट) रोजी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध करण्यात आला. विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी त्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी माफी न मागितल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ अशी मागणी नवनियुक्त जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांनी केली आहे.
प्रत्येक आमदाराने महायुती धर्म पाळावा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तात्काळ समज द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली.शिवसेनेचा बाप दुसरा कोणी नसून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत. अशी ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषदेला संदीप ठाकूर जिल्हाप्रमुख (शिंदेगट) गडचिरोली-आरमोरी विधानसभा, अर्चना गोंदोडे महिला जिल्हाप्रमुख आरमोरी विधानसभा, पुंडलिक येवले जिल्हप्रमुख ओबीसी विजेनटी, अश्विन तीतीरमारे आरमोरी शहरप्रमुख, छाया मानकर महिला तालुकाप्रमुख, स्नेहल मंडल बंगाली आघाडी, गुणाजी बोरकुटे तालुकाप्रमुख गडचिरोली, नितीन धोडरे, सत्यपाल कुतरमारे, रितिक मेश्राम, संजय पिपरे, ईश्वर हलदार, प्रफुल कोसे, सलमान सिद्दीकी, रितिक हुलके, संकेत सालोटकर, तेजस घोगरे, पुण्यवान सोरते, यशवंत काळबांधे यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
